पावनखिंड प्रस्तावना
ऐतिहासिक कादंबरींच्या श्रेणीत 'पावनखिंड' ही रणजित देसाईंची अखेरची कादंबरी होय. पारंपारिक ऐतिहासिक कादंबरींच्या पंक्तीतुन थोडी वेगळी कादंबरी लिहिण्याचा हेतू मनात ठेवून रणजितदेसाईंनी ही कादंबरी लिहीली.
बाजीप्रभू देशपांडेंच्या स्वराज्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा आणि अतुल्य पराक्रमाने कशी घोडखिंडीची पावनखिंड झाली याचे वर्णन या कादंबरी आहे. बाजीप्रभूंच्या देशभक्तीचे, शौर्याचे अचूक चित्रण या कादंबरीमध्ये आढळते. वाक्प्रचार, म्हणी आणि संवाद या सर्व गोष्टीमुळे त्या वेळेच्या काळाची योग्य अशी वातावरणनिर्मिती 'पावनखिंड' कादंबरी वाचतांना अनुभवायला मिळते.
एका लढाई मध्ये शत्रु म्हणून समोर आलेल्या बाजीप्रभुंना शिवरायांनी कसे आपलेसे केले? त्या नंतर, बाजींचे थोरले बंधू फुलाजीहे सुद्धा महाराजांकडे कसे आले? याचे वर्णन या कादंबरी मध्ये आहे. 'पावनखिंड' वाचतानाअखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या या योद्ध्याची स्वामीभक्ती, जिद्द आणि पराक्रम पाहून मन भरून येते. ‘भाऊ जगण्याचं सार्थक केलंस.. गेलास.. म्हणजे जातोस कुठं.. तू मोठा ना.. तुझा मान पहिला... मी मागून आलोच... असे या कादंबरी मधील बाजींचे आपल्या मोठ्या भावा साठीचे संवाद बाजीप्रभुंच्या मनाचा मोठेपणा सांगुन जातात. याच पावनखिंडीत बाजीप्रभुंसोबत त्यांचे जेष्ठ बंधू फुलाजी यांना सुद्धा वीरमरण आले होते तेव्हाचा हा संवाद आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज हे पावनखिंडी पुरते मर्यादित नसून बाजीप्रभूंनी अफजलखानाची भेट, सिद्दीच्या वेढ्यातून सुटका या महत्त्वाच्या घटनांमध्ये महाराजांना कशी मदत केली हे या कादंबरीमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे. बाजीप्रभुंनी, फुलाजींनी स्वराज्यासाठी आपल्या महाराजांना अखेरच्या श्वासा पर्यंत सहकार्य केले आणि मरतानासुद्धा राजांना मुजरा करूनचं प्राण सोडले अशा या अवलिया वीर योद्ध्यांना आणि शिवरायांना आमचा मानाचा मुजरा.
खाली दिलेल्या लिंक वर रणजित देसाई लिखित 'पावनखिंड' ही कादंबरी पीडीएफ स्वरूपात मोफत डाउनलोडींग साठी उपलबध्द केली आहे. कृपया वाचकांनी लाभ घ्यावा आणि आपले अभिप्राय कंमेंट बॉक्स मध्ये नक्की दयावेत. धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद ...श्रीराम सावजी , मालवण
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासुन धन्यवाद.
Deleteअतिशय सुरेख शब्दांकन आहे संपुर्ण वाचलयाशिवाय चैन पडत नाही खूप खूप धन्यवाद -
ReplyDeleteआपल्या अभिप्रायाबद्दल आभार.
DeleteJay shiv shivray
ReplyDeleteSir mala bajind चे pdf हवे आहे कुणाकडे असतील तर pls send करा 8492068005
ReplyDeleteअप्रतिम पुस्तक मिळवुन दिल्याबद्दल तुमचे मनापासुन खुप खुप आभार
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासुन आभार.
Delete