Shivbharat Book in Marathi PDF | शिवभारत ग्रंथ


'शिवभारत' हा ग्रंथ मुळ तमिळ भाषेत सापडल्या नंतर त्यावर खूप अभ्यास झाला, नंतर असे समजले की, तो मुळ मराठी/मोडी/ किंवा संस्कृत असावा आणि तमिळ मध्ये त्याचा अनुवाद करून तो जतन केला गेला होता.



(खालील माहिती शिवभारत ग्रंथातील असून बोली भाषेतील  मराठी आणि ग्रंथातील मराठी लिखाण थोड वेगळे वाटते.)

शके १८४१ या वर्षी म्हणजे सुमारे आठ वर्षांखाली आपल्या मंडळाचे उत्साही सभासद रा. रा. सदाशिव महादेव ऊर्फ बाबा दिवेकर मु. कल्याण यांनी तमिळ शिवभारताचा उडता परिचय सप्तम संमेलन प्रसंगी करून दिला. जी थोडी माहिती त्या तमिळ मजकुराच्या इंग्रजीत करविलेल्या भाषांतरावरून पुढे आले त्यावरून सर्व ऐकणारांची जिज्ञासा जागृत झाली. पुढे मूळ ग्रंथ संस्कृत असला पाहिजे हैं रा. दिवेकर यांचे ध्यानी आल्यावर त्याचा शोध करून त्यांनी तो ग्रंथ नकलून आणविला. शके १८३८ साली के. टिळकांचे द्वारा पुढे आलेल्या जेधे शकावलीतील शिवकालीन मित्यांमुळे मंडळातील अभ्यासी संशोधकांत मोठी खळबळ उडून गेली होती; आणि श्री शिवजन्माची जेधे यांनी दिलेली मितीच बहुतेक तंतोतंत जेव्हां शिवभारतांत आढळली तेव्हां प्रथम संशय आणि मागाहून कुतूहल अतोनात वाढले. मावळाचे एका कोप न्यांतील जेध्यांची कारी एका टोकाला आणि दूरच्या तामीलनाड मधील एका भागांतील भोसल्याचे तंजावर दुसन्या टोकाला ! या दोन टोकांतून जेव्हां श्री शिवजन्मतिथी नवाच आणि संवादि सूर निघूं लागला तेव्हां मति घटकाभर गुंगच झाली, आरंभी हैं कसैसेच बाटे, पुढे जेधे मित्तीची चिकित्सा अस्सल कागदांच्या मुकाबल्याने करण्यास प्रारंभ झाला. रा. जोशी, रा. पुरंदरे प्रमृनी नवे कागद पुढे मांडले. रा.द. वि. आपटे यांनी आपली तीक्ष्ण संशोधक व गाणितिक नजर लावून त्यांची तपासणी केली आणि पहिला संशयाचा झटका इलकेहलके उतरला आपण बखरीच्या युगांतून पुढील असेल पत्रांच्या युगांत प्रविष्ट होत आहोत हे ध्यानात आले आणि आजवर प्रमाण बाटणारी किस्येक ऐति ह्य धिटाईने भिरकावून देण्यास प्रारंभ झाला. वसंतोदयापूर्वी जशी वृक्षाची पाने गळून पडणे आणि नवी पालवी फुटणे हा सृष्टिक्रमच आहे तसेच मानवी ज्ञानवृक्षाचेहि आहे. नवे शोध झाले म्हणजे जुने समज आपोआप गळून पडतात.

जशी शिवजन्ममिति या शिवभारतांत अगदी नवीच सापडली तशीच इतरहि माहिती पुष्कळच नवी आहे असें परीक्षणांती दिसून आले आणि असेहि दिसन आले की ही माहिती अस्सल कागदपत्रांतील व तत्कालीन इतिहासांतील इतर माहितीशी पुष्कळ मिळती आहे. 'काव्यांत इतिहास कोठून येईल १' अशीहि शंका मनात होती. परंतु परमानंदाचे हैं शिवभारत तस्या काव्यकोटतलें दिसेना, परमानन्द हा कसबी कवी खरा, परंतु हा इतिहासवेत्ता कवी आहे अशी खात्री पटली. या सालीचेंच पर्यवसान म्हणजे या समग्र (उपलब्ध असलेल्या) ग्रंथाची प्रसिद्धि करण्याची हिंमत धरून रा. दिवेकर यांनी तडीला नेली हे होय. आपला संकल्प याप्रमाणे सिद्धीला नेऊन रा. दिवेकर यांनी मोठेच कार्य शेवटास नेलें आहे.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 'शिवभारत' पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकता. 'शिवभारत' वाचून झाल्यावर आपले अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद!



2 comments:

  1. आपण इथे स्पष्ट नमूद केलंय की टिळकामुळे शिवजन्मतिथीचा वाद पुढे आला.. टिळकाला बाजुला केलं की खरी जन्मतिथि वैशाख 3शके 1549.तथा 8 एप्रिल 1627 हीच खरी तारिख पुढे सोते... ज्या जेधे शकावली वरून 19/2/1630 ही तारिख पुढे आली ती शकावली 1926 ला प्रकाशित आहे...

    ReplyDelete