श्रीमानयोगी प्रस्तावना
'श्रीमानयोगी' ही रणजित देसाई लिखित कादंबरी आहे. स्वामी कादंबरी नंतर जवळ जवळ सात वर्षांनी श्रीमानयोगी या भारदस्त नावाची कादंबरी वाचकांपुढे सादर झाली.
शिवाजी महाराजांसारख्या महान युगपुरुषाची व्यक्तिरेखा नव्याने उभी करणे हे प्रचंड कठीण काम कारण, शिवचरित्राबाबत आपल्याच इतिहासकारांमध्ये जेवढे दुमत आहे तेवढे दुमत असलेले दुसरे व्यक्ती चरित्र नाही. महाराजांच्या जन्मापासून त्यांचा मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. अशा अडचणीतुन मार्ग काढून ललित वाङ्मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम रणजित देसाई यांनी केले. शिवाजी महाराज ही व्यक्तिरेखा फार भावनिक आहे. ‘श्रीमानयोगी’ ही मराठी ललित वाङ्मयात शिवाजी महाराजांना सादर करणारी प्रथम कादंबरी असून त्याचे पूर्ण श्रेय रणजित देसाईंचे आहे.
इतिहास आणि कल्पना मनोमिलनाने ऐतिहासिक ललितकृती तयार होते याचे प्रत्यंतर श्रीमानयोगी वाचताना होते. ही कादंबरी लिहीताना रणजित देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, दंतकथा, आख्यायिका या सार्यांचा वापर केला आहे.
कोणत्याही इतिहासाचे अवलोकन केले तर राज्य निर्माण करणारे राजे, सेनानी आपणांस आढळतील आणि त्यात त्यांनी कोण्या नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेलेही दिसेल. महाराजांच्या बाबतीत मात्र त्यांना शुन्यातून सुरवात करावी लागली. चार बलाढ्य सत्तांचे राज्य चारी बाजूने असताना महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या, क्रूर,राजनीतिज्ञ, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा विरोधिं बरोबर झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा जाणता राजा इतिहासात आढळत नाही आणि इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अष्ठपैलुत्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू ही सर्व विशेषणे महाराजांना लागतात. महाराजांचे कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास वाचकांच्या डोळ्याचे पारणे फेडतो आणि म्हणूनच श्रीमानयोगी निश्चितच मराठी मनात अढळ स्थान प्राप्त करणारी कादंबरी आहे.
खाली दिलेल्या लिंक वर संपूर्ण 'श्रीमानयोगी' कादंबरी पीडीएफ स्वरूपात मोफत डाउनलोडींग उपलबध्द केली आहे कृपया वाचकांनी लाभ घ्यावा आणि आपले अभिप्राय कंमेंट बॉक्स मध्ये नक्की दयावेत. धन्यवाद!
No comments:
Post a Comment